चोपडा (प्रतिनिधी) एशियन पिकल बॉल स्पर्धा 2023 मध्ये तैवान (तैयपेई) येथे माळी समाजाचे चोपडा (पाटीलगढी) येथील चि. तेजस महाजन व वांशिक कपाडिया (मुंबई) सोबत मेन्स डबल्समध्ये गोल्ड मेडल मिळवले. तसेच चि.तेजस महाजन व चि.कुलदीप महाजन या दोघ भावंडांनी टीम इव्हेंटमध्ये सुध्दा सिल्वर मेडल व रोख बक्षीस मिळवून आपल्या भारत देशाचे नाव लौकिक केले.
चि. तेजस व चि.कुलदीप यांचे आई-वडील रवींद्र नारायण महाजन व मायाताई रवींद्र महाजन हे सर्वसामान्य परिस्थितीचे असूनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्पोर्टमध्ये सुध्दा मुलांना पाठबळ देवून भारतातील विविध नामांकित शहरात तसेच विदेशात पाठविण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. या दोघ बंधूंचे सर्वचस्तरातून मित्रपरिवार, नातलग समाज बांधव यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच या दोघ बंधूंनी आगामी काळात, आई -वडील, नातलग,समाजाचे, गावाचे व आपल्या भारत देशाचे नाव लौकिक व यश प्राप्त करत राहावे, अशा शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.
तैवान येथे झालेल्या एशियन पिकलबॉल 2023 स्पर्धेसाठी प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल ऑल इंडिया पिकलबॉल असोशियान (AIPA) विलेपार्ले तर्फे मा.अरविंद प्रभूजी सर (दादा) निखिलजी माथूर सर आणि यशोधनजी सर यांचे या दोघ भावांना मोलाचे सहकार्य लाभले.
















