TheClearNews.Com
Sunday, May 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नियमांची पायमल्ली करणार्‍यांची खैर नाही : प्रांताधिकारी विनय गोसावी

धरणगावात पाच दिवसांचा कडकडीत बंद ; पालकमंत्र्यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील कोरोना बाधीतांच्या संख्येत होणारी लक्षणीय वाढ पाहता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान पाच दिवसांचा कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची घोषणा आज प्रशासनातर्फे करण्यात आली. जनतेने याला सहकार्य करावे, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आजच्या बैठकीत दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव शहर आणि तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत आहेत. यातच शहरातील संसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. या बाबींची दखल घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वत: रूग्णालयात उपचार घेत असतांना प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्याशी चर्चा करत त्यांना कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

READ ALSO

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

या अनुषंगाने आज धरणगाव नगरपालिका कार्यालयात प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक, पत्रकार, व्यापारी संघ पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, पी.आय. हिरे, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांताधिकारी गोसावी यांनी सद्यस्थितीची भयावहता नमूद करत कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे नमूद केले. यावर चर्चा झाल्यानंतर धरणगाव शहरात दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जनतेने या कर्फ्यूचे पुरेपूर पालन करून घरातच बसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी याप्रसंगी दिला.

दिनांक २३ ते २७ मार्चच्या दरम्यान दारूचे दुकानासह सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार बंद राहतील, किराणा दुकाने, नॉन इसेन्शियल इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र बंदरातील, शैक्षणिक संस्था,शाळा महाविद्यालय, खासगी कार्यालय, सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे बंद रातील. केवळ पुजारी दैनंदिन पूजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील. हॉटेल रेस्टॉरंट अत्यावश्यक सेवेसाठी घरपोच डिलीवरी पार्सल वगळता बंद राहतील. सभा,मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे,सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद रातील.

शॉपिंग मार्केट, बियर शॉप, स्पा सलून, लिकर शॉप, दारू दुकाने, फेरीवाले बंद रातील. गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृह, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन, बंद रातील. पान टपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री ची ठिकाणे बंद रातील. दुधाचे दुकाने, मेडिकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मीडिया सेवा, कुरियर, पेट्रोल पंप,अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी रुग्णाला ने-आण करणारी रीक्षा सुरू राहील.आवश्यक सेवेसाठी गॅरेज शासकीय कार्यालय ५०% उपस्थित, पूर्वीचे नियोजित परीक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील. आंतरजिल्हा व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतूक जसे एसटी महामंडळ,पोस्ट विभागाच्या वाहने सुरू राहतील.

रेल्वे, विमान, बससेवा सुरू राहील. वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या निर्बंध मधून दूध विक्री केंद्रे वैद्यकीय उपचार व सेवा मेडिकल स्टोअर, ऍम्बुलन्स सेवा, नगर परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाची व शासकीय संबंधित घटक यांना सूट देण्यात येत आहे. तसेच इतर शासकीय आस्थापनांना जसे की कृषी विभाग, महावितरण, टेलिफोन, घरपोच सर्वे सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करून नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसील कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहील.

धरणगाव नगरपरिषद हद्दीत लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील यासाठी नगरपालिका कार्यालयाने पथके नेमावी व पोलिस निरीक्षक यांनी पोलिस बंदोबस्त पुरवावा असे आदेशात नमूद आहेत.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर भारतीय दंड संहिता १८६० ४५ चे कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे तरतुदींचा शिक्षेस पात्र राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगावची कांचन चौधरी रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फडणवीसांचा मास्टर प्लान? राज्यात पुन्हा युतीची चर्चा

November 6, 2022

तहसीलदार व एसआयओच्या संगनमताने भ्रष्टाचार : दोषींवर कारवाई करण्याची शैलेश सपकाळे यांची मागणी

January 19, 2023

पाचोरा येथील विद्यालयातील विद्यार्थ्याचा छळ ; अँड. कुणाल पवारांना पत्र !

May 20, 2021

हृदयद्रावक : सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू !

July 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group