मुंबई (वृत्तसंस्था) शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही संकटात सापडले आहे. या सर्व घडामोडीवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावर आता मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही, अशी खोचक टीका संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर केली आहे.
राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून “मराठी माणूस भावनिक आहे पण मूर्ख नाही” अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “40 च्या वर आमदार सोडून गेले, त्या विरोधात कुठे ही शिवसैनिकांमध्ये उद्रेक नाही.
संदीप देशपांडे पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांना काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या नसतात. झाकली मूठ सव्वा लाखांची असते आणि त्यांच्या मनातलं ओळखून निर्णय घ्यायचा असतो. अजून किती स्पष्ट दाखवाच. याआधी, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ठाकरेवर टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “असली गुहाटीत नकली “वर्षा” वर आणि सेक्युलर गॅस वर.” तुम्ही वाचताय मुख्यमंत्री साहेब. पण कळतंय पण वळत नाही. अशी अवस्था झाल्यासारखी वाटतेय, अशा शब्दांत संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर व्यक्त केलं आहे.