मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडलं आहे, यादरम्यान राष्ट्रवादीचे नेत शरद पवार यांनी मविआ सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. बहुमत आहे की नाही ते विधानसभेत दिसेल असे पवार म्हणाले आहेत.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अडीच वर्षे महाविकास आघाडीने चांगले काम केले. कोरोना काळात चांगले काम केले. प्रसिद्धी माध्यमातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले आहेत त्याची वस्तुस्थिती लोकांना सांगतिली आहे, आणि अजूनही त्यातील आमदार शिवसेनेसोबत आहोत हे स्पष्ट करतील, असं शरद पवार म्हणाले.
या परिस्थितीवर मात करुन महाविकास आघाडीचे सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. या अडीच वर्षात महाविकास आघाडीने चांगले काम केले आहे. चांगले निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग फसलेला नाही. गुवाहाटीला गेलेले आमदार परत आले की स्पष्ट होईल बहुमत कोणाच्या बाजूने आहे, पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आहे हे देशाला दिसेल, असंही शरद पवार म्हणाले.