अमळनेर (प्रतिनिधी) केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांचा जळगाव जिल्हा दौरा दि. २६ आणि २७ जून २०२१ रोजी नियोजित केलेला आहे.
दि. २५ जून रोजी रात्री नऊ वाजता मलकापूर विश्रामगृह येथे मुक्काम व बुलढाणा जिल्हा कार्यकर्त्यांशी संघटनेविषयी चर्चा, दि. २६ जून रोजी सकाळी नऊ वाजता कु-हा-काकोडा येथे उत्तर महाराष्ट्र संघटन सचिव श्री भागवतशेठ राठोड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, त्यानंतर ११ वाजता मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताईदर्शन, त्यानंतर माजी महसूल तथा कृषी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांची सदिच्छा भेट व राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी संघटनेच्या कार्या विषयी चर्चा, त्यानंतर एक वाजता बोदवड येथे डॉ. प्रशांत बडगुजर जिल्हा सहसचिव यांच्या निवासस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण, त्यानंतर दुपारी तीन वाजता भुसावळ येथे भुसावळ व रावेर, यावल तालुका कार्यकारणी सोबत चर्चा आणि भुसावळ येथे दोन कर्तृत्ववान महिलांना खानदेश रणरागिणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार त्याच दिवशी नशिराबाद येथे मुक्काम याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सभासद करण्याविषयी सुद्धा चर्चा केली जाणार आहे.
दिनांक २७ जून २०२१ रविवारला सकाळी आठ वाजता अजिंठा विश्राम गृह जळगाव येथे जळगाव जिल्हा तसेच तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा व सत्कार समारंभ, त्यानंतर पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे पद्मश्री तथा मॅगसेसे पुरस्कार विजेत्या समाजसेवीका नीलिमाताई मिस्त्रा यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना दोन महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिकाच्या मानद डॉक्टरेटने उज्जैनकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे समाज भूषण पुरस्काराने जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया तथा जळगाव तालुका उपाध्यक्षा ज्योतीताई राणे, बुलढाणा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबन महामुने यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजु भटकर, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश पोतदार, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश सैनी, उत्तर महाराष्ट्र महासचिव प्राचार्य जगदीश सूर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र संघटक भागवतशेठ राठोड, जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. अजय पाटील उपाध्यक्ष ललितकुमार फिरके के. डी. पाटील साहेब उपाध्यक्षा साधनाताई लोखंडे, सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, सहसचिव डॉ. प्रशांत बडगुजर, महासचिव विनोदभाऊ पाटील, हकीम चौधरी, कार्याध्यक्ष आर. के. पाटील, राजूभाऊ सवळे, कोषाध्यक्ष विकास पाटील, राजेश पाटील, जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, जिल्हा संघटक प्रा.बी.जी.माळी, जिल्हा सल्लागार प्राचार्य डॉ. सुरेश वराडे, जळगाव तालुका अध्यक्ष किशोर पाटील, सचिव अजयकुमार पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष विनायक वाडेकर, बोदवड तालुका अध्यक्ष सुभाष शुरपाटणे, रावेर तालुका महेंद्र महाजन, सन्माननीय अध्यक्ष तथा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे या दौऱ्याचे मुख्य आयोजक तथा केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर यांनी कळवले आहे.
तसेच या कोरोना लॉकडाऊनच्या काळामुळे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ होऊ न शकल्यामुळे हा सोहळा बहादरपुर तालुका पारोळा येथे आयोजित असुन केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की, केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंदजी दहिवले यांच्या विविध ठिकाणच्या दौऱ्या प्रसंगी आपणास शक्य असल्यास त्या त्या ठिकाणी अवश्य उपस्थिती द्यावी त्यांचा पूर्वीचा दौरा रद्द करण्यात आला होता. हा दौरा सुनियोजित असल्याचे शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे.
















