जळगाव (प्रतिनिधी) नारायण राणे यांच्या अंगात काय चेटकीण घुसली की काय?, असे मला वाटतेय. कोणत्या तरी भक्ताकडे नेऊन राणेंच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज आहे, अशा शब्दात शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर बोलताना मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती, असे वक्तव्य केले आहे, त्यावर शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, नारायण राणे यांनी वक्तव्या बाबत माफी मागण्याची गरज नाहीय. मुख्यमंत्री यांची माफी मागण्याची देखील लायकी राणे यांची नाही. बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा त्यांनी कसे बोलावे हे मला त्यांना सांगावे लागते याचीच मला राणे यांची कीव येते. एकेकाळी नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले विरोधी पक्ष येथे आला आहे. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाची गरिमा काय असते याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण राज्याचा असतो त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे याचे त्यांना भान नसेल तर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले पाहिजे वेळ पडली तर त्यांना शॉक सुध्दा दिले पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर बोलताना मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती, असे वक्तव्य केले आहे. त्यावर शिवसेना राज्यभरात आक्रमक झालेली असतांना दिसून येत आहे.