नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असलेला देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा खाली आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ८४,३३२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात मृतांचा आकडा मात्र वाढला आहे. २ हजार ००२ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले
देशातील कोरोना संसर्गाचा प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांमध्ये देशभरात १ लाख २१ हजार ३११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर ८४ हजार ३३२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय ४ हजार ००२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये आढळलेली कोरोनाबाधितांची संख्या ही मागील ७० दिवसांमधील निच्चांकी संख्या ठरली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,९३,५९,१५५ झाली असून, २,७९,११,३८४ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, आजपर्यंत देशात ३,६७,०८१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १०,८०,६९० असून, आजपर्यंत २४,९६,००,३०४ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
देशातील कोरोना मृत्यूदर १.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.