नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीच्या नरेला इंडस्ट्रियल एरियामध्ये एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी ऑनलाईन क्लासेससाठी घरात एकटी असल्याची माहिती शेजाऱ्याला होती. त्यामुळे कोणत्यातरी बहाण्याने घरात घुसून मुलीवर बलात्कार केला. पोलिसांनी पॉक्सो आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सौरभ असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
वास्तविक ही मुलगी नरेला परिसरात तिच्या आई वडिलांसोबत राहते. ही मुलगी इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी असून सध्या तिचे ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे बुधवारी मुलगी ऑनलाईन क्लासेससाठी घरात एकटी होती. मुलीला घरी सोडून तिचे आई-वडील कामावर गेले होते. मुलीचे आई-वडील कारखान्यात कामगार आहेत. मुलगी घरात एकटी असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्या सौरभला होती. त्यामुळे शेजारी राहत असलेल्या सौरभने कोणत्यातरी बहाण्याने घरात घुसून मुलगी एकटी पाहून तिच्यासोबत बलात्काराची घटना केली. एवढेच नाही तर मुलीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली.
सायंकाळी आई-वडील घरी परतले असता मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पीडितेकडून संपूर्ण घटनेची क्रम जाणून घेतला आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सौरभला पोलिसांनी अटक केली आहे.