नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतामधील साक्षरतेच्या बाबतील अव्वल असलेल्या केरळमधून (Kerala) एक अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमधील कासारगोड जिल्ह्यात एका गरोदर बकरीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हॉटेल कामगार असलेला सेंथिल असे आरोपीचे नाव असून तो मूळचा तामिळनाडूचा आहे.
हॉटेल मालकाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बकरीच्या आवाजाने इतर कर्मचाऱ्यांना जाग आली. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांना पिंजऱ्याच्या बाहेर गरोदर बकरी रक्ताळलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी घटनास्थळावरून एक व्यक्ती पळतानाही पाहिली, ज्याची नंतर आरोपी म्हणून ओळख पटली. सेंथिल जवळपास दोन वर्षापासून हॉटेलमध्ये काम करत होता.
या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपीवर प्राण्यांच्या क्रूरतेच्या संबंधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यात आणखी दोन जणांचा सहभाग असल्याचे हॉटेल मालकांनी सांगितले असले तरी सेंथिल हा एकमेव आरोपी असल्याचे पोलिसांना आढळले.
होसदुर्ग स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणाले की, तक्रारीच्या आधारे अनैसर्गिक गुन्ह्यासाठी कलम समाविष्ट केले आहे. “शवविच्छेदन करणाऱ्या सरकारी पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांच्या प्राथमिक अहवालात बकरीवर अनैसर्गिक लैंगिक छळ केल्याचे दिसून आले. सविस्तर अहवालातूनच मृत्यूचे कारण समोर येईल,” असे ते पुढे म्हणाले.