TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्ह्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका/ नगरपरिषदांचे प्रलंबित प्रश्‍न तात्काळ मार्गी लावून जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढणार असल्याचे आश्‍वासन नगरविकास मंत्री ना. एकनाथराव शिंदे यांनी काल दिले. दरम्यान, जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटींचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सायंकाळी मनपा सभागृहात जिल्ह्यातील नगरपालिकांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर, मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी आदि उपस्थित होते.

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

आढावा बैठकीत बोलातांना ना. शिंदे यांनी नगरविकास विभागाची मुंबईत स्वतंत्र बैठक घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासीत केले आहे.

रस्त्यांसाठी तात्काळ ४२ कोटी मंजूर करणार

शहरातील रस्ते सुस्थितीत रहावे यासाठी ४२ कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात येणार असल्याचे ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

जळगाव मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा प्रश्‍न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. सर्वसामान्य गाळेधारकांना न्याय मिळेल. आणि महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल. यासाठी गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. असे अश्‍वासन ना. शिंदे यांनी यावेळी दिले.

मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार

मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव मंजुर करावा. अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. यावर बोलतांना ना. शिंदे यांनी पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करुन निधी देण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळेस सांगितले.

प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावणार

विकासाच्या अनुषंगाने जळगाव महानगरपालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांनी प्रलंबित प्रश्‍नांची सुची तयार करावी. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि अधिकारी यांची मुंबईत बैठक घेवून जे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याजोगे असतील, ते तातडीने मार्गी लावणार असल्याचे ना. शिंदे यांनी सांगितले.

आढावा बैठकीत मनपासह जिल्ह्यातील न.पा. शहराच्या विकासासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा, लोकसभागातून कामे करा, आस्थापना खर्चावर नियंत्रण आणा, विकास कामे दर्जेदार करा, ती वेळेत पुर्ण करा. अशा सूचना ना. शिंदे यांनी आढावा दिल्यात.

विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी २५१ कोटींची अपेक्षा – पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी २५१ कोटी निधीची अपेक्षा असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहराच्या विकासासाठी डिपीडीसीतून ६१ कोटींचा निधी दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत ४२ कोटींचा निधी मंजुर करण्यात आल्याचेही पालकमंत्र्याकडुन सांगण्यात आले.

नगरविकास विभागाकडून विकासासाठी १५१ कोटी निधी मंजुर करावे. मेहरुण तलावाच्या सुशोभिकरणासाठी ५१ लाखांचा प्रस्ताव मंजुर करावा. हुडकोच्या कर्जाबाबत दिलासा द्यावा, गाळ्यांचा प्रलंबित प्रश्‍न सोडवावा, नगरपालिकांमधील रिक्त पदे भरावीत, चाळीसगाव- जामनेरसाठी मुख्याधिकार्‍यांची नियुक्ती करावी. नशिराबाद ग्रा.पं.चे नगरपरिषदेत रुपांतर झाले असून त्यासाठी निधी मिळावा, पारोळा-वरणगावमध्ये न.पा.च्या स्वतंत्र इमारतीसाठी निधी द्यावा. अशी अपेक्षा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

अमळनेर शहरातील गजानन नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्योती मेटेंना राज्यपाल कोट्यातून आमदार करा; राष्ट्रवादीची मागणी !

August 17, 2022

जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसेल तर मनसेला संपर्क करावा : अँड. जमील देशपांडे

August 8, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार २२ एप्रिल २०२३ !

April 22, 2023

शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत रक्त मिळणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

December 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group