कोल्हापूर (वृत्तसंस्था) खूप आले… खूप गेले…अनेकांनी घोषणा केल्या, पण मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबई सोबत उभी राहिले आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहित आहे. कोणाची साथ द्यायची, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई च्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. दरम्यान निधी वाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेसचे अनेक मंत्री आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना देखील मंत्री परब यांनी सर्वांना व्यवस्थित निधी मिळत आहे. कुणाला निधी कमी जास्त होत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलणे गरजेचे आहे असे देखील म्हटले आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिलामध्ये सवलती देण्यासाठी सध्या अभ्यास सुरू असून याचा फायदा किती जणांना होतो याचा देखील विचार करत आहोत. त्यावर अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल. दरम्यान विरोधकांना विरोध करण्याशिवाय काही काम नाही अस ही ते म्हणाले.