TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बाजारात फिरतांना धक्का लागल्याने मारेकऱ्यांनी बालकाला मारहाण करीत संशयितांनी तेजस गजानन महाजन (वय १४, रा. रिंगणगाव, ता. एरंडोल) चाकूने गळा चिरुन खून केला. त्यानंतर मृतदेह खांद्यावरुन नेत झुडपात फेकून देणाऱ्या तिघांचा एलसीबीने पर्दाफाश केला. कुठलाही पुरावा नसतांना पोलिसांनी तपासचक्रे फिरवित ३६ तासात गुन्ह्याचा उलगडा केला असून एकाला पळून जात असतांना तर दुसऱ्या मध्यप्रदेशातून अटक केली. तर तिसऱ्या संशयिताचा शोध घेतला जात आहे.

बेपत्ता असलेल्या तेजस महाजन या बालकाचा मंगळवारी सकाळी रिंगणगाव- खर्चे रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडपात गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एरंडोल पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी गावात बाजार असल्याने सायंकाळी ७ वाजता तेजस हा खर्चे गावाकडे जातांना दिसल्याने पोलिसांनी आजूबाजूला राहणाऱ्यांची चौकशी केली मात्र त्यांना तपासाचा कुठलाही धागा मिळत नव्हता.

READ ALSO

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

रावेरमार्गे मध्यप्रदेशला करीत होते पलायन
पेरणीचे दिवस असतांना संशयित हे मालकाला न सांगता निघून गेल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. त्याच्या शोधार्थ एलसीबीचे तीन पथके रवाना झाली. दरम्यान, पोलीस कर्मचारी गौरव पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण करीत वास्कले याचा शोध घेतला. दरम्यान, तो फैजपूर-रावेरमार्गे मध्यप्रदेशकडे जात असल्याचे समजले.

अन् इथे गवसला तपासाचा धागा
ज्या शेतामध्ये तेजसचा मृतदेह मिळून आला, तेथून ५० फुट अंतरावर मध्यप्रदेशातील एक कुटुंब राहत होते. त्यांची चौक शी केली असता, तेथे राहणारा हरदास वास्कले व त्यांच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हे नातेवाईकांच्या लग्नासाठी सकाळीच मध्यप्रदेशातील खरगोण येथे रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. हाच तपासाचा धागा गवसताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवली.

एकाच्या पळून जातांना तर दुसऱ्याला मध्यप्रदेशातून अटक
पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी फैजपूर व रावेर पोलिसांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नाकाबंदी सुरु असतांना संशयित हरदास वास्कले हा दुचाकीवरुन येतांना दिसताच सपोनि रामेश्वर मोताळे यांच्यासह पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने शेजारी राहणारा सुरेश खरते व गावातील रिचडीया कटोले यांच्या मदतीने त्याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर दुसरे पथक संशयीत सुरेश खरते याच्या शोधार्थ पथक मध्यप्रदेशकडे रवाना झाले. खरते हा मध्यप्रदेशातील धुपा या गावात असल्याचे समजताच पथकाने दहा किमी पायी जावून संशयित सुरेश खरते याला अटक केली. तसेच त्यांचा तिसरा साथीदार रिचडीया कटोले याचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

या पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी सागर कोते, आण्णासाहेब घोलप, केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि संदीप पाटील, एरंडोल पोनि निलेश गायकवाड यांच्यासह पोउनि सोपान गोरे, शरद बागल, डोमाळे, श्रीकृष्ण देशमुख, रवी नरवाडे, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, विष्णू बिहऱ्हाळे, प्रवीण मांडोळे, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, महेश सोमवंशी, संदीप पाटील, किशोर पाटील, प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, रविंद्र पाटील यांच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
Next Post

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : कंडारेला जळगावात आणून कसून चौकशी ; मुख्य कार्यालयात पुन्हा एकदा झाडाझडती !

July 6, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार : वर्षा गायकवाड

November 20, 2020

*शेतीमालास हमीभाव, पिकविमा संरक्षण, ई-नाम सारखी पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे मोदी सरकार पुन्हा आणणार…*

April 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group