TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निलंबित पोलीस निरीक्षक बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला पोलिसांचा कडाडून विरोध !

जाणून घ्या...अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या अटकपूर्व जामीन अर्जाला जळगाव पोलिसांनी आज कडाडून विरोध केला. यावर आता अंतिम युक्तिवाद २३ तारखेला होणार आहे.

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने याबाबत पोलिसांचा खुलासा मागवला होता. त्यानुसार आज (बुधवार) रोजी पोलिसांनी आपले म्हणणे सादर करत बकालेंच्या जामीन अर्जाला कडाडून विरोध केला आहे. त्यानुसार नमूद गुन्ह्यातील संशयितरित्या ऑडीओ क्लिप प्रसारित करणारा सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात त्याचा आक्षेपार्ह संभाषण असलेला मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रार दिली होती. ही तक्रार खोटी असून गुन्हयातील महत्वाचा भौतिक पुरावा नष्ट करण्यात प्रयत्न केला असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच त्याचा गुन्हयातील सहभाग तपासणे बाकी असून अटक करणे देखील आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

बकालेंचा मोबाईल ‘त्या’ दिवसापासून बंद !

ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यापासून किरणकुमार बकालेंनी देखील आपला मोबाईल दि.१५ सप्टेंबर पासून बंद करून ठेवलेला आहे. बकाले देखील सहाय्यक फौजदार महाजन यांच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास बकाले आपला मोबाईल हजर करणार नाहीत. परीणामी मोबाईल जप्त करता येणार नाही, अशी पोलिसांना खात्री असल्यामुळे बकाले यांच्या अटकेची गरज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

तपासात अडथळा आणून पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता

गुन्हयाचा तपास प्राथमिक स्वरुपात आहे. त्यामुळे बकालेंना अटक करणे गरजेचे असून अटक न केल्यास गुन्हयातील महत्त्वाचा पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच संशयित आरोपी हा साक्षीदार व इतरांना दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करत पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच बकाले हे पोलीस खात्यातील असल्यामुळे त्यांना मोबाईल बाबत संपूर्ण माहीती असून गुन्हयातील पुरावे हे तांत्रिक व क्लिष्ठ स्वरुपाचे असल्याने ते नष्ट करू शकतो. एवढेच नव्हे तर अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास त्याच्या ओळखीचा प्रभाव पाडून तपासात अडथळा आणण्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

बकाले अटक टाळण्यासाठी भूमिगत, निलंबन कालावधीत हजेरीही लावली नाही !

गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत. आगदी त्यांचा मोबाईल देखील बंद करुन ठेवला आहे. एवढेच नव्हे तर निलंबन कालावधीत पोलीस उपधिक्षक गृह, नाशिक ग्रामीण यांच्याकडे हजर होत नियमीत हजेरी देण्याबाबत आदेश दिल्यानंतरही बकाले नमुद ठिकाणी हजर झालेले नाहीय. यावरून बकाले आपली अटक टाळत असल्याचा पोलिसांचे म्हणणे आहे.

आवाजाचे नमुने घेण्याची आवश्यकता

पोलिसांना चौकशी कामी किरणकुमार बकाले यांच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बकालेंचा अटकपूर्व जामीन मंजुर झाल्यास जनमानसात असंतोष व प्रक्षोभ निर्माण होऊन पुनश्चः कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती देखील आहे. तसेच सदर गुन्हयातील वादग्रस्त व्हायरल ऑडीओ क्लिप नेमकी कुणी व्हायरल केली? याबाबतची चौकशी करावयाची असल्यामूळे बकाले यांना अटक करायची असल्याचे देखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, यावर अंतिम सुनावणी २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, मूळ फिर्यादी विनोद देशमुख यांच्यातर्फे अॅ.गोपाळ जळमकर आणि सरकार पक्षातर्फे अॅड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज बघितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: jalgaon policelcb pi kirankumar bakale

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

सरणावर झोपून सुरु असलेल्या उपोषणाची सांगता ; तहसीलदार नियुक्तीचे महसूल मंत्र्यांकडून आश्वासन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, एका पायलटचा मृत्यू

January 26, 2021

अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांनी खरेदी केली – सौमय्यांचा आरोप

November 11, 2020

दोघी बहिणी वारंवार घरुन पळून जायच्या, आई-वडिलांनी उचलले भयंकर पाऊल !

April 16, 2023

फिल्मी स्टाईल अगदी सगळं ठरल्यागत…दरोडेखोर बँकेत चालत आले…डोळ्यात स्प्रे मारला ; कर्मचाऱ्यांना बंधक बनविले आणि करोडोंचे दागिने, लाखोंची रोकड लुटून क्षणात पसार झाले !

June 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group