अकोला (वृत्तसंस्था) देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण (Politics) म्हणजे गांडूचे राजकारण असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते अकोल्यात (Akola) बोलत होते. मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पण त्यांचा दिलेर पनाही दिसला नाही, असंही ते म्हणाले.
आंबेडकर म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पंरतु, त्यांचा दिलेर पनाही ही दिसला नाही आणि मैदानी पणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. दिलेर पणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. असेही आंबेडकर म्हणाले.
फडणवीस यांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी दाबण्यासाठी नोटिस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान आंबेडकर यांनी कॉंग्रेसच्या आत्मचिंतन बैठकीवर बोलणे टाळले आहे. देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती.
















