पिंप्री खु. (संतोष पांडे) : येथे आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पिंप्री खुर्द येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी पाहणीही केली.
आज, 4 मार्च रोजी, ग्रामपंचायत पिंप्री खुर्द येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, पंचायत समिती धरणगावचे गटविकास अधिकारी अजित सिंग पवार, कैलास पाटील, विस्ताराधिकारी योगेंद्र अहिरे, सतिश कोळी विस्ताराधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी सुनील बोरसे, दिनेश भदाणे गृहनिर्माण अभियंता आणि ग्रामपंचायत कार्यकारणी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांचे कामाचे शुभारंभ करण्यात आले.
यावेळी सुरू झालेल्या कामांची पाहणी देखील करण्यात आली. सर्व घरकुलधारकांना लवकरात लवकर घरकुले पूर्ण करण्याबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले.