भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील वांजोळा रोडवरील स्टार लॉनजवळ अवैधरीत्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक केली जात असताना महसूल प्रशासनाने एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त केले. मात्र, कारवाईला विरोध करीत दोघांनी पथकाला दमदाटी करीत अडथळा निर्माण केल्याने तिघांविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मंडळाधिकारी योगीता योगेश पाटील (जामनेर रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रॅक्टर चालक तथा संशयित आरोपी सुधाकर मधुकर सोनवणे (46, खडका, बजरंग बली मंदिराजवळ, भुसावळ) हा विनापरवाना वाळू वाहतूक करताना त्यास स्टार लॉननजवळ शुक्रवारी सकाळी 11 वाजता अडवल्यानंतर संशयित गिरीश तायडे व योगेश तायडे (खडका, ता.भुसावळ) हे स्कॉर्पिओ वाहनातून आले व त्याने पथकाशी हुज्जत घालून त्यांना दमदाटी करीत शासकीय कर्तव्यात अडथळा आणला. याप्रकरणी तिघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.