बोदवड (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम विभागाला हरणखेड गावापासून जाणाऱ्या जिल्ह्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यास जोडणाऱ्या सर्व रस्त्यांच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सुशोभीकरण व स्ट्रीट लाईट लावणे कामे रस्ते रुंदीकरण मिळून मिळणे बाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरपंच रुपेश गांधी यांनी आज २४ जुलै रोजी निमखेड फाटा ते हरण खेड रस्त्यावरती आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की हरणखेड येथील गावालगत हरणखेड एणगाव व हरणखेड ते निमखेड, वडजी, चिखली बुद्रुक रस्ता व राजुर रस्ता या हरणखेड गावात लागून असलेल्या एक किलोमीटर पर्यंत सदर रस्त्यांचे मध्यभागी सुशोभीकरण करणे व स्ट्रीट लाईट लावण्यासाठी मध्यभागात डिव्हायडर लावण्याकामी सदरच्या रस्त्यांचे रुंदीकरण करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनात रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे हरणखेड गावाच्या रस्त्यांचे सुशोभीकरण तसेच स्ट्रीट लाईट लावून सदर रस्त्यांचे रुंदीकरण होऊन गावाजवळील रस्त्यालगत अतिक्रमण होणार नाही व वाहतूक करणे साठी व रस्ते वापरण्यासाठी नागरिकांच्या सोयीचे होईल या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच हरणखेड गाव व हरण खेड ते निमखेड रस्त्यालगतच्या दोन्ही साईडच्या साईट पट्ट्या देखील अस्तित्वात नाहीत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ शकते व तसे झाल्यास सदर होणाऱ्या अपघातास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी नेहमीच साईडटपट्टी नसल्याने वाहने घसरून अपघात होय राहतात काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी व प्रवासी असलेली बस रस्त्याखाली घसरली होती. मात्र लगेच गावकऱ्यांनी ट्रॅकटरच्या सहाय्यने बस उलटण्याआधी बाहेर काढली होती. या विषयी सरपंच यांनी दोन वेळा बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करून देखील या बाबीवर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मरणपत्र देऊनही कार्यवाही न झाल्याने सरपंच रुपेश गांधी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला होता. तसेच सदर निवेदन माहितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आमदार एकनाथराव खडसे तसेच बोदवड पोलीस निरीक्षक व बोदवड तहसीलदार यांना माहितीसाठी सादर केलेले आहे.