जळगाव (प्रतिनिधी) ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत दस्त नोंदणी केल्यास मुद्रांक शुल्कांत तीन टक्के सवलत राज्य शासनाने घोषीत केलेली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा जळगाव जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग- २ व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी – १ कार्यालय शनिवार, दि. १२, १९ व २६ डिसेंबर, २०२० या दिवशी सुरू राहतील. असे मुद्रांक जिल्हाधिकारी विजय सुधाकरराव भालेराव व प्रशासकीय अधिकारी सुनील पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.