धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी संजय शिरोळे व त्यांच्या पत्नी लताबाई संजय शिरोळे हे दाम्पत्य काल देवदर्शनासाठी धुळे येथे जाऊन परत येत असताना अमळनेरनजीक त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यांना धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून लताबाईंच्या डोक्याला मार लागलेला आहे. पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकामध्ये आज धुळे येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये जाऊन या दाम्पत्याच्या तब्येतीची चौकशी केली व डॉक्टरांना लक्ष देण्याच्या सूचना दिल्या.