मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर (Kirit Somaiya Car Attack) खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला झाला होता. यावेळी सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखमच कृत्रिम (Fake injury) असण्याची शंका आता घेतली जाते आहे. दरम्यान, ही जखम बनावट होती कीय काय, अशी शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली आहे. गृहखात्याकडून सोमय्या हल्लाप्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार आहे, असंही सांगितलं जातंय.
किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात शनिवारी रात्री गेले होते. तिथे त्यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. ही भेट झाल्यानंतर खार पोलीस स्थानकाबाहेर तुफान राडा झाला. खार पोलीस स्थानकाबाहेर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यानंतर दगडफेक आणि चप्पल किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेनं भिरकावण्यात आल्या होत्या. यात किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या काचेला भेदून एक दगड गाडीतून आत घुसला. यात किरीट सोमय्या जखमी झाले होते. त्यांच्या हनुवटीतून रक्त येत असल्याचंही व्हिडीओमध्ये नंतर दिसून आलं होतं.
शिवसेनेचा आरोप
दरम्यान, खार पोलीस स्थानकाबाहेरील शिवसैनिकांनी परस्परविरोधी आरोप किरीट सोमय्यांवर लावला आहे. किरीट सोमय्यांनी आपल्या अंगावर गाडी घातल्यामुळी शिवसैनिक आक्रमक झाले, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, यानंतर किरीट सोमय्या यांच्या चालकाविरोधात तक्रारही देण्यात आली होती.