TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुनील झंवरच्या भोवतीचा फास होणार घट्ट ; शालेय पोषण आहार घोटाळ्याचीही आर्थिक गुन्हे शाखेकडे होणार तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील झाडाझडतीच्या वेळेस सापडलेले जिल्हा परिषदमधील बनावट शिक्के हे शालेय पोषण या घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समोर आले होते. या घोटाळ्याविरोधात सन २०१४ पासून लढा देणारे रवींद्र शिंदे हे लवकरच याबाबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे पुराव्यांसह तक्रार देणार आहेत. यानिमित्ताने ‘बीएचआर’नंतर आता शालेय पोषण घोटाळ्यातही सुनील झंवरच्या भोवतीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सदरचा गुन्हा हा आर्थिक गुन्हा असल्याने व ठेकेदारासोबत झालेला करारनामा हा शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत पुणे येथे झाला असल्याने याबाबतचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांच्याकडे दाखल करण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एक महिन्यापूर्वी पत्र देऊन केले आहे.

 

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

जिल्ह्यातील पोषण आहार घोटाळ्यात प्रत्येकवेळी नवीन अपहार आणि गोंधळ समोर येत असतो. त्यानुसार आता जिल्ह्यातील पोषण आहार घोटाळ्याची व्याप्ती लाखोत नव्हे तर करोडो रुपयात असल्याची माहिती समोर येत आहे. सन २०१४ पासून लढा देणारे रवींद्र शिंदे यांनी याबाबत स्थानिक प्रशासनासह मंत्रालयापर्यंत तक्रारी केलेल्या आहेत. धान्यादी मालाच्या वजनात घट, पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पट दराने मसाले पदार्थ वितरित करणे तसेच शाळांमध्ये धान्य न देताच त्यांची देयके अदा करण्यात आली होती़. यात तालुका स्तरावरील वाहतूकदार यांनी बनावट शिक्के तयार करून तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक व ठेकेदार यांनी संगनमत करून बनावट शिक्के व स्वाक्षऱ्यांच्या आधारावर हा प्रकार केल्याचे समोर आले होते़. एवढेच नव्हे तर पोषण आहार पुरवठ्याच्या करारातील नियम आणि अटीशर्तींचे पुरवठादाराकडून पालन होत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. जि.प.चे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी तक्रारदार रवींद्र शिंदे यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर तात्काळ आपल्या स्वाक्षरीने चौकशी समिती नेमली होती. या समितीला शालेय पोषण आहार योजनेत चौकशी केल्यानंतर पुरवठादार झंवरच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती. त्यानंतर दिवेगावकर यांची अवघ्या आठ दिवसात तडकाफडकी बदली झाली होती.

 

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी उद्योजक सुनील झंवर यांच्या ऑफिसमधून शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे तब्बल शंभरहून अधिक बनावट शिक्के आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले होते. त्यानंतर या बोगस शिक्क्यांचे धागेदोरे थेट जिल्हा परिषदेपर्यंत येऊन पोहोचले होते. बीएचआर घोटाळा प्रकरणी टाकलेल्या छाप्यात सुनील झंवरच्या कार्यालयात पिशवी भरून विविध शासकीय राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिक्के आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. कारण या शिक्यांच्या माध्यमातून शालेय पोषण आहार योजनेत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के आणि स्वाक्षरी करून बिले काढल्याची चर्चा जिल्हा परिषदच्या वर्तुळात सुरु होती.

 

रवींद्र शिंदे यांच्या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिईओ कौस्तुभ दिवेगावकर यांना शालेय पोषण आहार योजनेत बोगस बिले काढली जात असल्याचा संशय आला होता. त्यांनी चार तालुक्यांची सॅम्पल चौकशी केल्यानंतर त्यात पुरवठादार असलेल्या झंवर यांच्या कंपनीने १ लाख ३७ हजारांची खोटी बिले काढल्याची बाब पुढे आली होती.

 

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एक महिन्यापूर्वी तक्रार केली आहे. मला आशा आहे की, मंत्री गायकवाड मॅडम याबाबतचे आदेश काढतील आणि आर्थिक गुन्हे शाखा गुन्हा दाखल करेल. मंत्र्यांनी आदेश न दिल्यास लवकरच सर्व पुराव्यांसकट आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके मॅडम यांची भेट घेवून रीतसर फिर्याद वजा तक्रार देणार आहे.

– रवींद्र शिंदे
मुख्य तक्रारदार, (शालेय पोषण आहार घोटाळा, जळगाव)

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; त्वरित कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हे घाणेरडं राजकारण ठाकरे- पवारच करू शकतात’ : किरीट सोमय्या

November 1, 2021

पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी संजय गोहील कायम !

May 4, 2021

नाट्यमय कलाटणी ः जिल्हाबँक चेअरमनपदी संजय पवार ; मंगेश चव्हाण यांची खेळी यशस्वी !

March 11, 2023

Swine Flu : धास्ती वाढली ;११ जणांचा मृत्यू

August 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group