औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरातील क्रांती चौकामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास पार पडला. दरम्यान, यावेळी अनावरण सोहळा पाहण्यासाठी आलेल्या गर्दीचा संयम सुटत चालला होता. त्याच दरम्यान मीडियाच्या कॅमेरासाठी लावण्यात आलेला स्टेज लोकांच्या रेटारेटीमुळे मोडून पडला. पण पत्रकारांच्या समयसूचकतामूळे तीन बालकं थोडक्यात बचावले.
रात्री १० वाजेपासून कार्यक्रमाला सुरवात झाली. महाराजांच्या पुतळ्यापासून चारही दिशांच्या १ कि.मी. हून अधिक अंतरापर्यंत असलेला हजारो शिवप्रेमींचा शिवसागर या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार ठरला. पण यावेळी गर्दीच्या रेट्यामुळे मीडियासाठी तयार केलेला स्टेज अचानक कोसळला. विशेष म्हणजे स्टेज कोसळण्याच्या अंदाज आल्याने पाच मिनिटांपूर्वी स्टेजवर बसलेल्या तीन चिमुकल्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचे पत्रकार मोसीन शेख आणि टिव्ही पत्रकार माधव सावरगावे यांनी समयसूचकता दाखवत मुलांना स्टेजवरून उतरून घेण्याच पालकांना सांगितले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात काही पत्रकारांना मार लागला आहे.
शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंच पुतळा
पुतळ्याची २१ फुट उंची आहे, पुतळ्याचे वजन ०७ मेट्रीक टन आहे, पुतळ्यासाठी ब्रांझ धातु वापरण्यात आलेला आहे, पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची ३१ फुट आहे, चौथाऱ्यासह पुतळ्याची एकुण उंची ५२ फुट, चौथाऱ्याचे बांधकाम आर. सी. सी. मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे, चौथाऱ्याभोवतीच्या २४ कमानीत २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत.