जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सरकारच्या जन कल्याणाच्या योजना किंवा त्या योजनांची माहिती गरजू घटकापर्यंत कशी पोचवतात, याचा एक चांगला अनुभव जुन्या जळगावात नुकताच आला. विषय होता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्यमान भारत योजना.
केंद्र सरकारच्या योजना सर्व सामान्य गरजू माणसापर्यंत पोहचविण्यासाठीचे एक अभियान सध्या भाजप तर्फे राबविण्यात आहे. काल जुन्या जळगावात एका कामा निमित्त गेलो असता, आयुष्यमान भारत कार्ड आणि नव मतदार नोदणी शिबिर भरल्याचे नजरेस पडले. अधिक माहिती घेतली असता, शिबिर भाजप चे कार्यकर्ते माजी उप महापौर सुनिल वामन खडके यांनी भरविल्याचे सांगण्यात आले जरा वेळ तेथे थांबून माहिती घेतली असता दोन दिवसा साठी हे शिबीर घेण्यात आले होते,पण नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेवून एक दिवसांसाठी वाढविण्यात आले.
जुन्या जळगावातील सुमारे एक हजार कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले. हे अभियान वजा उपक्रम श्री खडके यांनी अतिशय प्रभावी पणे राबविल्याचे दिसून आले. एरव्ही काही ठिकाणी आयुष्यमान योजना शिबिर प्रति व्यक्ती 70 ते100 रूपये शुल्क आकारले जाते. मात्र, या शिबिराचा संपूर्ण खर्च श्री.खडके यांनी उचलून नागरिकासाठी विनामूल्य कार्ड उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले,त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. कार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व कुशल कामगार ही त्यांनी तैनात केले होते. हे काम राजकिय नव्हे तर सामाजिक भावनेतून ते आणि त्यांची टीम करीत असल्याचे दिसून आले. नव मतदार नोदणीस देखिल लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, असे शिबीर विविध भागात घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.















