बोदवड(प्रतिनिधी) :तालुक्यातील एणगांव येथील जी डी ढाके हायस्कूल मधील सांस्कृतिक व कला विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांनी एक शालेय उपक्रम म्हणून शाडू माती पासून गणपती तयार करण्याच्या स्पर्धेत, मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षकांनी उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कल्पनांमधून विविध मुद्रेतील गणपती शाडू मातीपासून तयार केलेत. आणि आपला सक्रिय सहभाग या उपक्रमात नोंदविला. सदर स्पर्धेसाठी, विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख एन आर राजपूत सर, एम पी कोळी सर आणि मनोज बहुरूपे सर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सुप्त शक्तीला, त्यांच्या सर्जनशीलतेला वाट करून देण्याचे विविध शालेय उपक्रम आपल्या विद्यालयात राबवले जातात. अशा विविध उपक्रमातीलच एक भाग म्हणून सांस्कृतिक आणि कला विभागातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबविला गेला,अशी भावना शिक्षकांनी बोलून दाखवली.
अशा पर्यावरण पूरक कार्यक्रमांची देशाला गरज आहे. असे कार्यक्रम आपण आपल्या विद्यालयात नेहमी राबवत असतो. सन्माननीय संचालक मंडळ यांनी या पर्यावरण पूरक चळवळीचे कौतुक करुन सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.