चाळीसगाव(प्रतिनिधी) : तालुक्यातील खेडी खुर्द येथील रहिवासी व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डी. पी. पाटील यांच्या बंद घरातून नऊ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना घडली.
यात सोने, चांदी व रोख रक्कमेचा समावेश आहे. ते २८ रोजी गावाहून परतले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्यात आला. चाळीसगाव विभागाचे वापी अभयसिंह देशमुख यांनी ही घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञ व श्वानपथक मागवून परिसर पिंजून काढण्यात आला. निवृत्त पोलीस अधिक्षकाकडे झालेल्या या चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत
















