चोपडा (प्रतिनिधी) येथील एका पाच वर्षीय आदिवासी मुलीवर मध्यप्रदेशातील 22 वर्षे नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्थानकात मयाल गिरदार वास्कले (वय 22) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील रा. पिपऱ्यापानी ग्रा.प. चिलऱ्या ता. वरला येथील राहणारा आरोपी मयाल गिरदार वास्कले (वय 22) याने कुरकुरे घेऊन देतो या बहाण्याने एका पाच वर्षीय मुलीला झोपडीत नाहीत बलात्कार केला. मुलीने आरडाओरड केल्याने आजुबाजुच्या लोकांनी झोपडीकडे धाव घेत संशयित आरोपीला पकडून ठेवले व यश चौधरी नामक इसमाने घटनेचे गांभीर्य घेता पोलिसांना याबाबत माहिती कळवली. चोपडा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पीडित मुलीसह संशयित आरोपीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
यावेळी पीडित मुलीवर डॉ. तृप्ति पाटील यांनी तात्काळ उपचार सुरु केले. यावेळी पोलीस अधिकारी मधुकर सावळे, एकनाथ भिसे, जितेन्द्र वल्टे, पो.कॉ. संतोष पारधी यांनी पुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत केले. पीडित मुलीच्या पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संशयित आरोपी हा आदिवासी असल्याने त्याची भाषा समजत नव्हती. त्यामुळे गुन्हा नोंदविण्याच्या कामकाजात अडचण येत होती मात्र डॉक्टर चंद्रकांत बारेला हे उपजिल्हा रुग्णालयात धावून आल्याने बोलीभाषा चा प्रश्न सुटला व पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे काम सोपे झाले. यावेळी डॉ. बारेला यानी घटनेचा तीव्र निषेध करुन कारवाई करण्याची मागणी केली.