चंदीगड (वृत्तसंस्था) हरयाणाच्या हिसार गावातील सोरखीमध्ये विवाहितेने आपल्या पतीला त्याच्या वहिनीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. यानंतर पतीनेच तिची धुलाई केली आणि शेवटी तिला विषारी घोळ प्यायला देऊन जीव घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ करणे आणि मारहाणीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
हिसारमधील गावात सोरखी निवासी उषाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. सहा वर्षांपूर्वी तिचं लग्न ईश्वरसोबत झालं होतं. त्यांना पाच वर्षांची मुलगीदेखील आहे. पत्नीचा आरोप आहे की, त्याचे पतीच्या वहिणीसोबत अवैध संबंध आहेत. सोबतच सासरची मंडळी तिला लग्नानंतर हुंड्यासाठी छळ करीत होते. पत्नीने सांगितलं की, ४ मार्च रोजी तिचा पती घरात एका खोलीत त्याच्या वहिनीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत होता. त्याचवेळी पत्नी खोलीत पोहोचली. यानंतर मोठी जाव खोलीतून बाहेर गेली. पत्नीने पतीला या सर्व गोष्टींचा जाब विचारला. यानंतर पतीने तिला खूप मारहाण केली.
आरडाओरडा ऐकून सासरची अन्य मंडळी त्या खोलीत आले. यानंतर पती ईश्वरने विषारी घोळ तयार केलं आणि सासरच्या अन्य लोकांनी पकडून पत्नीला हे प्यायला दिलं. यानंतर तिला मरण्यासाठी सोडून दिलं. तिने कसंबसं माहेरी भावाला फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. यानंतर ती बेशुद्ध झाली. ती रात्री जेव्हा शुद्धीत आली तेव्हा ती रुग्णालयात होती.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पीडितेला तिची सासरची मंडळी हुंड्यासाठी त्राक देत होती. तिच्या पतीचे त्याच्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. त्याचा विरोध केला म्हणून तिला मारहाण करण्यात आली. आणि विषारी पदार्थ प्यायला दिलं. पोलिसांनी या प्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.