चंद्रपूर (प्रतिनिधी) प्रचंड उकाड्यामुळे अंगणात झोपलेल्या महिलेचा वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंदाबाई एकनाथ सिहाम (५३) असे मृत महिलेचे नाव आहे. सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथे रात्री २ वाजता ही थरारक घटना पडली.
माहितीनुसार सिडाम या अंगणातील खाटेवर झोपल्या होत्या. दरम्यान, रात्री अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घातली. वाघ त्यांना खाटेवरून उचलून जंगलाच्या दिशेने घेऊन निघाला. महिलेचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. लोकांनी आरडाओरडा केल्याने वाघाने सिडाम यांना सोडून जंगलाच्या दिशेने धाव घेतली. वाघाच्या दातामुळे मानेवर खोल जखमा झाल्याने सिडाम यांचा मृत्यू झाला. घटनेचा सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना पंचनामा केला. वनविभागाने मृतकाचा परिवाराला २५ हजारांची मदत केली. या घटनेने गावात दहशत पसरली आहे.