जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मानियार बिरादरीने कोरोना रुग्णांसाठी एकाच आठवड्यात दुसरा उपक्रम म्हणजे एच आर सि टी करणाऱ्या रुग्णांना फक्त १८०० रुपयांमध्ये तपासणी उपलब्ध करून देत आहे. तसेच तीनच दिवसा पूर्वी रेमडीसीवर इंजेक्शन हे सुध्दा फक्त १०५० रुपयात उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या या दोघी कामाचे मी जळगावची प्रथम नागरिक म्हणून स्वागत व अभिनंदन करते असे प्रेरणादायी उदगार जळगाव शहराच्या नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांनी केले. त्यांच्या कार्यालयात एच आर सि टी कुपनचे वाटप करताना यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नगरसेवक सुनील महाजन, प्रशांत नाईक, मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, बिरादरीचे युवा संचालक एडवोकेट आमिर शेख व मोहसीन शेख यांची उपस्थिती होती.
सिटीस्कॅन व रेमडीसीवर साठी रुग्णांचा भरघोस प्रतिसाद
कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीवर इंजेक्शन सुद्धा जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ने फक्त १०५० रुपयात उपलब्ध करून दिलेला आहे तसेच एच आर सिटी सुद्धा फक्त १८०० रुपयात उपलब्ध करून दिल्याने या दोन्ही तपासणीसाठी रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे व खऱ्या अर्थाने रुग्णासोबत समाजाची सेवा करण्याचा आनंद मिळत असल्याचे बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले.
सारा हॉस्पिटल व डे नाईट मेडिकलचे सहकार्य
या दोन्ही उपक्रमासाठी डे नाईट मेडिकल स्टोरचे संचालक समी अजिजी व एच आर सि टी साठी सारा मल्टी हॉस्पिटलचे डॉक्टर मिनाझ पटेल यांचे सहकार्य मिळत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अधिक माहिती साठी ९४२३१८५७८६, ९४२३४८७७८६ किंवा ९४२३९७८६११ यावर संपर्क साधावा असे आवाहन फारूक शेख यांनी केले आहे.