अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळ देव ग्रह मंदिर येथे विश्वातील पहीली काळया पाषाणातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण श्री भूमी मातेची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे.
या मूर्तीसह श्री पंचमुखी हनुमानाची मूर्ती व श्री मंगळदेव ग्रहाची पंचधातूची उत्सव मूर्ती यांची ३० रोजी आर. के. नगर येथील गणपती मंदिरापासून ते संत सखाराम महाराजांच्या वाडीपर्यंत सजविलेल्या ” श्री मंगल रथातून ” मोटारसायकल रॅलीने मिरवणूक काढण्यात आली. प्रशासनाने सीमित संख्येची मर्यादा घातल्याने मोजक्याच भाविकांना रॅलीत सामील करण्यात आले. या मूर्ती आता वाडीत ठेवण्यात आल्या आहेत. ८ जानेवारीला तिन्ही मूर्ती श्री मंगळ देव ग्रह मंदिर येथे मिरवणुकीने नेण्यात येतील. तेथे ९ व १० जानेवारीला संतश्री प्रसाद महाराज यांच्या शुभहस्ते व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठा होईल. दरम्यान आज या मूर्तीचे पहिले पूजन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी केले. या सर्व कार्यक्रमाच्या खर्चापोटी कृषीभूषण पाटील यांनी आज मंगळ ग्रह सेवा संस्थेला अडीच लाख रुपये रोख दिले.
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, ॲड. ललिता पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, पोलिस निरीक्षक अंबादास मोरे, जयवंतराव पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन योगेश मुंदडे, संचालक नीरज अग्रवाल, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडे, विक्रांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, नगरसेवक श्याम पाटील, राजेश पाटील, निशांत अग्रवाल व महावीर पहाडे, भाजपचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे, राकेश पाटील, माजी नगरसेवक विनोद कदम, बाळू कोठारी, गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष आर. बी. पवार, जी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एल. मेखा व त्यांचे सहकारी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुका सचिव भटेश्वर वाणी, संघटक गौतम बिऱ्हाडे, आशिष चौधरी, विशाल शर्मा, पोलिस नाईक डॉ. शरद पाटील, मंगळ मंदिराचे सेवेकरी उमाकांत हिरे, आर. जे. पाटील, राहुल पाटील, रविंद्र बोरसे आदींसह मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. मंगळ ग्रह मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. डिगंबर महाले यांनी माहिती दिली.