धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शामखेडा येथील तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघात होत असलेल्या विकास कामे पाहून व पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, युवानेते प्रताप पाटील यांच्या कामाचा धडाका पाहून धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील तरुणांनी आज पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. गणेश दिगाणे, जितेंद्र भिल, प्रवीण ठाकरे, विनोद शिंदे, किरण भिल, राकेश भिल, अजय भिल, प्रकाश सातपुते, दीपक भिल, संजय भिल, रतीलाल भिल, लालसिंग भिल यांनी प्रवेश केला.
यावेळी युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे, उपतालुका प्रमुख अमोल पाटील, मागासवर्गीय सेनेचे तालुका प्रमुख नवल पारधी, युवासेनेचे समाधान पाटील, महेंद्र पाटील, दीपक श्रीखंडे, युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुख आबा माळी, शेतकरी सेनेचे रावसाहेब पुडाआबा पाटील हे उपस्थित होते.