फैजपूर (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील बामणोद गावाचे बाहेरील एकविरा माता मंदिरातून चांदीचे मुकुट व चांदीचे छत्र तसेच दानपेटीत जमा झालेली रक्कम चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात रमेश गणपत सोनवणे (वय ५२ रा. बामणोद ता. यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजता ते दि. १५ मे २०२२ रोजी सकाळी ६ वाजेचे दरम्यान १५ हजार रुपये किंमतीचे चांदीचे २५० ग्रॅम वजनाचे मुकुट, १५ हजार ३०० रुपये किंमतीचे चांदीचे २८० ग्रॅम वजनाचे छत्र त्यास घंगरू असलेले, एक हजार रुपये रोख लोखंडी दान पेटीत दान म्हणून जमा झालेली अंदाजी रक्कम, असा एकूण ३१ हजार ३०० रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने बामणोद गावाचे बाहेर असलेले एकविरा माता मंदिराचे स्टिलचे गेटचे कुलुप तोडून लाकडी दरवाजा आत ढकलून मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करुन चोरुन नेला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ गोकुळ तायडे हे करीत आहेत.