जळगाव (प्रतिनिधी) पोलिसांच्या घरात घुसून मोबाईल चोरी केल्याची धक्कादायक घटना दि २१ रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पोलीस लाईन येथील दक्षता नगरातील रहिवासी असलेले जितेंद्र राजेंद्र राजपूत हे पोलीस शिपाई म्हणून नेमणुकीस असून ते शासकीय निवासस्थान बिल्डींग न ०२ रूम न ०३ येथे वास्तव्यास आहेत. दि २१ रोजीच्या पहाटे ३ ते ७ वाजेच्या सुमारास अद्यात चोरट्याने त्यांचा १० हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी जितेंद्र राजपूत यांनी तत्काळ जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेत अद्यात चोरट्याविरोधात गुहा दाखल केला आहे. पुढील तपास म.पो.ना सुवर्णा तायडे ह्या करीत आहेत.