चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील टाकळी प्र चा येथील सम्राट नगरातून अज्ञात चोरटयांनी दोन मोटारसायकल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जितेंद्र रामचंद्र बागूल (वय ५५ रा. भोले बाबा दरबार च्या पाठीमागे सम्राट नगर टाकळी प्र चा ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २१ जून २०२२ रोजी जितेंद्र बागुल यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची काळया रंगाची मोटार सायकल क्रमांक MH १९ DA ३६९३ ही जितेंद्र यांच्या समंतीवाचून लबाडीचा इराद्याने चोरून नेली. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील हे करीत आहेत.
सम्राट नगरातून मोटारसायकल चोरी
यासंदर्भात योगेश बळवंत साळुंखे (वय २८, रा. सम्राट नगर टाकळी प्र चा ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २० जून २०२२ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ३५ हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची प्लेटिना काळया रंगाची मोटरसायकल क्रमांक MH १९ CK ७३८७ ही टाकळी प्र चा गावातील सम्राट नगर मधून योगेश यांच्या संमतीवाचून लबाडीचा इराद्याने चोरून नेली. याप्रकरणी चाळीसगाव व शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना घोडेस्वार हे करीत आहेत.