पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी ज्याप्रमाणे रद्द केली. त्याच प्रमाणे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांची आमदारकी कधी रद्द होणार?, असा सवाल विरोधक विचारात आहेत. याबाबत पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. (Pune News)
अदानी प्रकरणात मोदी सरकारविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. ‘सर्व चोरांचं आडनाव मोदीचं आहे का’, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. 2019 मधील प्रकरणामध्ये सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीचा दोषी ठरवत आणि त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयानंतर मोदी सरकारविरोधात सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने छेडली आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना नाशिकमधील सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.