मुंबई (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी टोला हाणला होता. गुलाबरावांच्या या टीकेला मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत उत्तर दिलं आहे. “गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. असं ट्विट खोपकर केलय.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की, गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे. पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे अस अमेय खोपकर यांनी म्हंटल.
गुलाबराव पाटील काय म्हणाले होते ?
राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.
















