जळगाव (प्रतिनिधी) दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ निर्दोष मुक्त झाले आहेत. यावर त्यांनी योग्य प्रकारेच काम केलं होतं, त्यांनी कोणतंच अयोग्य काम केलं नव्हतं, असं म्हणत शिवसेनेचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी छगन भुजबळांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
छगन भुजबळ यांनी जे काम केलं होतं, ते योग्य पद्धतीनेच केलं होतं, यावर आज कोर्टाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालं आहे. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले आहे. पण त्यांना झालेला हा त्रास कधीही भरुन निघणार नाही. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. भुजबळ यांनी जे काम केले होते, ते योग्य पद्धतीने होते, यावर आज या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.