भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कजगाव येथील बाजारपेठेत मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकान फोडत रोकड लांबवली. तर बसस्थानक चौकातील माजी सरपंचाचे कृषिकेंद्र फोडण्याचे प्रयत्न सुरु असतांना कोणीतरी रस्त्याने जात असल्याने चोरट्यांनी तेथुन पळ काढला. या चोरीमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, मंगळवारी मध्यरात्रीनंतर चोरटयांनी कजगावच्या सराफ बाजारातील मुख्य गजबजलेल्या चौकातील प्रमोद ललवाणी यांचे नवकार मेडीकल फोडत तेथुन रोकड लांबवली. त्या अगोदर याच पेठेतील छोटुलाल जैन यांचे महावीर प्रोव्हिजन हे होलसेल किराणा दुकान फोडुन तेथुन रोकड रक्कम या चोरट्यांनी लांबवली. तर बसस्थानक चौकातील माजी सरपंच भानुदास महाजन यांचे कृषिकेंद्र फोडण्याचे प्रयत्न सुरु असतांना कोणीतरी रस्त्याने जात असल्याने चोरट्यांनी तेथुन पळ काढला. या चोरीमुळे व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पीएसआय सुशील सोनवणे, सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, ईश्वर पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये अज्ञात चोरटा कैद झाल्याने ते फुटेज पोलिसांनी नेले व पंचनामा केला.