जळगाव (प्रतिनिधी) औद्योगिक वसाहत परिसरातील दोन कंपन्यांमधून चोरट्याने दोन लाख रुपयांची रोकड लांबविली. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याने ५ ऑक्टोबर रोजी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास शटरचे कुलूप तोडले व शटर उचकवून आत प्रवेश केला. पूनम पेंट कंपनीतून ३० हजार रुपये तर ई सेक्टरमधील छबी इलेक्ट्रीकल कंपनीमधून एक लाख ७० हजार रुपये चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विजय गोविंद वाघुळदे (५४, रा. मुंदडा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत.
















