मुंबई (वृत्तसंस्था) सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमधून (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नुकताच बाहेर पडला आहे. अशातच कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमान कुणाशी पंगा घेतो आहे हे त्याला माहिती नाही. मी पण सातारचा आहे, असे शंभर सलमान गल्ली झाडायला उभे करेल असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे.
बिग बॉसचा शो हा पूर्ण फ्लॉप झाला होता. माझी इंट्री झाली आणि हा शो हिट झाला. तुम्ही आजवर त्या सलमानचा इतिहास एकदा पाहा आपल्यापेक्षा कुणी मोठं होत असल्याचे पाहताच त्याला राग येतो आणि तो काहीही बोलतो. मात्र मी काही त्याचे ऐकून घेणारा नाही. त्यामुळे त्याला मी जशास तसे उत्तर दिलं आहे. येत्या काळामध्ये देखील बिग बॉसमध्ये जे काही चालते, हा शो कशामुळे चालतो, हे मी सविस्तरपणे सांगणार असल्याचं अभिजित बिचुकलेनं सांगितलं आहे. सलमान काहीही म्हणाला तरी त्याला उत्तर द्यायला मी तयार असल्याचंही अभिजितनं यावेळी सांगितलं आहे.
एका न्युजवाहिनीशी बोलताना अभिजित बिचुकलेनं सलमानवर टीका केली आहे. तसेच या शो बाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. आपल्यावर जाणीवपूर्वक टीका करण्यात आल्याचं अभिजितनं म्हटलं आहे. तो म्हणाला, मी आता त्या शो मधूनव बाहेर पडलो आहे. त्याला चोवीस तास झाले आहे. मी प्रेक्षकांचा आभारी आहे. या शोमध्ये मी मजा केली. मात्र मला त्या शो विषयी बोलायचं आहे. त्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे. खूप काही बोलायचं आहे. मी स्वताहून या शो बाहेर येणार होतो. मला बाहेर पडताना बळजबरीनं आत बसवलं. हे काय आहे मला याचा खुलासा करायचा आहे.
जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करण्यात आले. माझे खच्चीकरण करण्यासाठी, सलमाननं जो राग प्रकट केला तो त्याला न शोभण्यासारखा आहे. सलमाननं माझा व्देष केला. त्याचा इतिहास पाहा. हा सीझन मी चालवला. सलमान फ्लॉप झाला. त्याची भाषा शोभण्यासारखी नव्हती. कुणीही काही बोलतं. मला राग आला. सलमान खान स्वताला काय समजतो कळत नाही. सलमान कुणाशी पंगा घेतो आहे हे त्याला माहिती नाही. मी पण सातारचा आहे. असे शंभर सलमान गल्ली झाडण्यासाठी उभे करेल. मला खूप काही बोलायचे आहे. या शब्दांत बिचुकले यांना नाराजी व्यक्त केली आहे.