मुंबई (वृत्तसंस्था) जर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न हवे असेल, तर पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम अकाउंट (Post Office Monthly Income Scheme) एक चांगली योजना ठरू शकते. पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीमच्या नावावरून तुम्ही समजू शकता की, ही एक मासिक उत्पन्न योजना आहे. या योजनेद्वारे, तुम्ही तुमचे पैसे पूर्ण हमीसह व व्याजासह परत मिळवू शकता.
…तर प्रत्येक महिन्याला मिळतील पैसे
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक ६.६ टक्के व्याज मिळतं. योजनेचा मुदत कालावधी ५ वर्षे आहे. म्हणजेच ५ वर्षांनंतर तुम्हाला मासिक उत्पन्नाची हमी मिळू लागेल. जर तुम्ही एकरकमी ४.५ लाख रुपये जमा केले तर ५ वर्षांनंतर तुम्हाला दरवर्षी २९,७०० रुपये मिळतील. जर तुम्हाला दर महिन्याला उत्पन्न हवे असेल, तर तुम्हाला दरमहा २४७५ रुपये मिळतील.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत फक्त १००० रुपयांमध्ये अकाउंट उघडता येते. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती हे अकाउंट उघडू शकते. एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त ३ खातेदारांसह अकाउंट उघडू शकते.
या अटी लक्षात ठेवा
या योजनेअंतर्गत अकाउंट उघडण्यासाठी एक अट अशी आहे की, तुम्ही १ वर्ष पूर्ण होण्याआधी तुमची ठेव काढू शकत नाही. तसंच तुम्ही योजनेचा मुदत कालावधी पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे ३ ते ५ वर्षांदरम्यान पैसे काढलेत, तर मूळ रक्कमेपैकी १ टक्का रक्कम वजा करून तुम्हाला पैसे दिले जातील. दुसरीकडे, जर तुम्ही योजनेचा मुदत कालावधी पूर्ण झाल्यावर पैसे काढले, तर तुम्हाला या योजनेचे सर्व फायदे मिळतील.
सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी अनेक योजनांवर चांगले रिटर्न मिळण्याचा दावा केला जात आहे. परंतु त्यांच्यापैकी काहींमध्ये जोखीम दर खूप जास्त आहेत. अनेक गुंतवणूकदार कमी फायदा पण सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये कमी धोका असतो. काही गुंतवणूक योजनांमध्ये मात्र चांगले रिटर्न मिळण्याबरोबरच जोखीमही कमी असते. तुम्हीही अशा गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.