मुंबई (वृत्तसंस्था) “कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी, भगवे कपडे पहनता है असे म्हणणारे आता अयोध्येला चाललेत” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
काल मंत्रीमंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये जे निर्णय घेण्यात आले आहेत त्या सूचनांचं नक्कीच पालन होणार असं ते म्हणाले. सध्याच्या राज्यभरात चाललेल्या वादावरुन मनसेवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. “धर्माच्या आणि जातीच्या नावाने आपलं नाव खराब करण्याचं काम काहीजण करत आहेत, खासकरुन असामाजिक संघटना आहेत त्यांना आपण उत्तर देणार आहोत.” असं ते म्हणाले.
शिवसेना हा छातीवर वार करणारा पक्ष आहे आम्ही पाठीमागून वार करत नाही.” असं ते बोलताना म्हणाले. आत्तापर्यंत आम्ही संयम बाळगला पण आमच्या डोक्यावरुन पाणी जात असेल तर आम्हाला इतरांना बुडवावं लागेल, मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील असं ते म्हणाले. आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज नाही आणि आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेऊनसुद्धा लढत नाहीत असं ते म्हणाले.
बाळासाहेब असते तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले असते
भाजपाच्या केंद्रीय मंत्री अश्विन कुमार चोबे यांनी “हनुमान चालीसाचे पठण करणाऱ्या व्यक्तींना तुम्ही तुरुंगात टाकत आहात. बाळासाहेब असते तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले असते.” असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, हनुमान चालीसाच्या पठणावरुन तुम्ही जातीय दंगे घडवत असाल तर आमच्या या निर्णयावर बाळासाहेबांनी फुलेच ऊधळली असती. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला लावला आहे.
कोण है आदित्य? वो टकलू, गंजा आदमी..
छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान म्हणून ज्या पद्धतीने औरंगजेब यांच्या दरबारातून बाहेर पडले त्याच पद्धतीने शिवसेनेच्या हिंदुत्वाचा अपमान होतोय हे लक्षात आल्यावर आम्ही बाहेर पडलो आणि स्वाभिमानाने आज उभे आहोत, आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये असं ते म्हणाले. “कोण है आदित्य? वो टकलू, गंजा आदमी.. भगवे कपडे पहन के घुमता है पागल जैसा.. कहेने वाले अयोध्या जा रहे है..” असं म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर निशाना साधला आहे