जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेने बसवलेल्या बोजा बाबत जाब विचारायला येत, बँकेतील कर्मचाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्जदार असलेल्या महावीर अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटी या संस्थेचे संचालक सुरेश बन्सीलाल जैन यांच्या मालमत्तेवर जिल्हा बँकेने बोजा बसवला आहे. या संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी बँकेने त्यांना घरी जावून नोटीस बजावली होती. बँकेने सुरेश जैन यांच्या मालमत्तेवर बोजा चढवला आहे. वसुली अधिकारी मयुर संतोष पाटील यांनी त्यांना घरी जावून नोटीस बजावली होती.
यानंतर सुरेश जैन हे १६ डिसेंबर रोजी मुलासह जिल्हा बँकेच्या मुख्यालयात आले होते. दुपारी ४.३० वाजता ते व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे यांच्या दालनात गेले. त्याच ठिकाणी त्यांनी मयुर पाटील यांना दम दिल्याची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे यांनी जिल्हापेठ पोलिसांत दिली. यानंतर जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्या आला आहे.