अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका महिलेचे फोटो मोबाईलमध्ये दाखवून तिला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या व बदनामीची धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका बचत गटाचे काम करणाऱ्या महिलेशी खोकरपाट येथील दुलीचंद धनसिंग पाटील याने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून तिला तिचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये पाठवले. तसेच एका महिलेने तिरंगा चौकात त्या पीडित महिलेला तिचे कपडे बदल करत असतानाचे फोटो दाखवून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. पुन्हा दुलीचंद याने या महिलेचा विनयभंग करत तिला शरीरसुखाची मागणी करत तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुलीचंद पाटील व त्या महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७९, ३५२, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६७ सी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले करत आहेत.