पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) परिसरातील एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात गुलाब बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, २४ वर्षीय महिलेला एकटी असल्याचे पाहून गुलाब बाविस्कर याने महिलेचा डावा हात पकडून महिलेसोबत अश्लील वर्तन केले. यानंतर महिलेला तू कोणास सांगितले तर तुला मारुन टाकीन अशी धमकी देत मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्थानकात गुलाब बाविस्कर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. प्रशांत विरणारे हे करीत आहेत.