चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील लासुर ते सत्रासेन रोडवर नाटेश्वर मंदिराजवळुन तीन जण गांजा विक्री करण्यासाठी मोटरसायकलवर घेऊन जातांना मिळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासुर गावापासून जवळच असलेल्या नाटेश्वर मंदिरा जवळून जाणाऱ्या लासुर ते सत्रासेन रोडवर दि. २ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास तीन संशयानं पोलिसांनी थांबवले असता त्यांच्या ताब्यात स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता आपल्या ताब्यातील १ लाख ७७ हजार ७४४ रुपये किमतीचा गांजा (दोन मोटरसायकसह) हा विक्री करण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवर वाहतूक करीत असताना आले.
तिघांनी चौकशीअंती आपली नावे टेट्या झगड्या बारेला (वय २० वर्ष रा.डुकल्यापाणी ता.वरला जि.बडवाणी,मध्य प्रदेश),बिलरसिंग दगड्या पावरा (वय २२ रा.खाऱ्यापाडा ता.चोपडा),मिथुन दगड्या पावरा (वय १९ खाऱ्यापाडा ता.चोपडा), असल्याची सांगितली. तिघां विरोधात पोकॉ.भरत नाईक यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सीसीटीएनएस १७५/२०२३ गुंगीकारक पदार्थाचे अधिनियम १९८५ चे कलम २०(ब) व २२ प्रमाणे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पो.नि. कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा.पो.नि.शेषराव नितनवरे हे करीत आहे.
















