चोपडा (प्रतिनिधी) गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलीसांनी तीन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांसह तिघांना मध्यरात्री अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अखत्यारित दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सत्रासेनमार्गे एक राखाडी रंगाची एरटीगा गाडी क्रमांक (एम.एच.१२.आर एफ.१४९६) या गाडीत तीन जण गावठी कट्टे (पिस्टल) घेवुन निघाले आहेत. यानंतर पो.नि. कावेरी कमलाकर यांनी तात्काळ रात्रगस्तचे पोलीस हवालदार शशीकांत पारधी,चालक पोहेकॉ किरण धनगर, होमगार्ड श्रावण तेली,होमगार्ड संजय चौधरी यांना सूचना केली.
सूचना मिळताच पथकाने शिताफीने सापळा रचत बुधगाव फाट्याजवळ संशयित कारला थांबविले. गाडीची झाडा झडती घेतली असता सदर गाडीत ३ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतुस मिळून आलेत. संशयितांनी जफर रहिम शेख (वय ३३ वर्ष रा.भाजीबाजार घोड नदी शिरुर ता.शिरुर जि.पुणे), तरबेज ताहिर शेख (वय २९ वर्ष रा.सेंटर दवाखाना समोर रिव्हेनी कॉलनी शिरुर ता.शिरुर जि.पुणे),कलिम अब्दुल रहमान सैय्यद (वय ३४ वर्ष), अशी आपली नावे सागितली. चोपडा ग्रामीण पो.स्टे.सीसीटिएनएस गुरनं.३३/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व तिन्ही आरोपीनां अटक करण्यात असून चोपडा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कावेरी कमलाकर पोना.शशीकांत पारधी चालक पोहेकॉ.किरण धनगर होमगार्ड.श्रावण तेली,होमगार्ड.संजय चौधरी,सफौ.राजु महाजन,सफौ.देविदास ईशी,पो.कॉ. प्रमोद पारधी,पोकॉ.मनेश गावीत,पोकॉ.विनोद पवार,पोकॉ.महेंद्र भिल,पोकॉ.संदिप निळे यांनी कारवाई कामी मदत केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास सफौ,देविदास ईशी हे करीत आहे.