भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशात (Madhya Pradesh News) तीन बसेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झालाय तर ३९ जणं जखमी झालेत. एका भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून अपघातग्रस्त बस परत येत होती. (Madhya Pradesh Bus Accident ) अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
मध्य प्रदेशातील सिद्धी -रिवा दरम्यान हा अपघात झाला. दुर्घटनेतील जखमींवर रेवा आणि सिद्धी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. ट्रकच्या धडकेनंतर दोन बस एकमेकांवर धडकल्यानंतर सुमारे १० फूट खोल खड्ड्यात पडल्या. यात एका बसचा चक्काचूर झाला. या अपघातात एका कारलाही धडक बसली. या अपघातात आठ जणांचा जागीच तर चार जणांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
चुरहट पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनिया बोगद्याजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने तीन बसला धडक दिली. या बसेस सतना येथे आयोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व बस सतना येथून थेट रामपूर बघेलान आणि रिवा मार्गे मोहनिया बोगद्याकडे जात होत्या. लोकांना अन्नाची पाकिटे वाटली जात असतानाच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बस अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे रीवा येथे पोहोचले. त्यांनी संजय गांधी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर केली. तसेच मयतांच्या कुटुबांतील सदस्यांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.