जळगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या खेडी परिसरातील साई गीता नगरात साडेतीन लाख रुपयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, खेडी परिसरातील साईगिता नगररात चंचल टेकचंद शर्मा (वय ४१) कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शर्मा कुटूंबीय गेल्या महिनाभरापासून दिल्ली येथे गेलेले आहेत. परिणामी बंद घराची रेकी करुन चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून प्रवेश केला. चंचल शर्मा यांच्या घरातील कपाटातून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, दागिने व ५० हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. शर्मा यांची रोहित रोडवेज नावाने जळगावात ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. घरकाम करणाऱ्या नोकराला घरफोडी झाल्याचे लक्षात आल्याने त्याने शर्मा यांना माहिती दिली. त्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.