पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) पाळधी पोलीस दूरक्षेत्राचे स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी निवडणुकीच्या काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रशंसापत्र देऊन त्यांचा गौरव केला.
पाळधी गावाच्या हद्दीत २७ गावे तर एकूण ४८ बूथ होते. या सर्व बूथवर अचूक नियोजन ठेवत कुठेही वाद होणार नाहीत, याची काळजी घेणे. तसेच अचूक माहिती वरिष्ठांना देणे, याची सर्व काळजी तसेच उत्कृष्ट नियोजन करुन मतदान अगदी शांततेत पार पाडल्याबद्दल स.पो.नि. प्रशांत कंडारे यांचा गौरव करण्यात आला.
हा गौरव माझा नसून पाळधी दूरक्षेत्रातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. सर्व सहकाऱ्यांनी उत्तम साथ दिल्यामुळे हे सर्व काही करू शकलो, तसेच नागरिकांनी ही सहकार्य केले. त्यामुळे सर्व शक्य झाले. मी या सर्वांचे आभार मानतो, अशा भावना स.पो.नि. प्रशांत कंडारे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. दरम्यान, हा गौरव झाल्याबद्दल सर्वत्र सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे यांचे कौतुक केले जात आहे.